टी २० सामन्यांसाठी मुंबई लीगचे सहप्रायोजक बनले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने, संजय घोडावत समूहाच्या अंतर्गत कार्यरत, टी 20 मुंबई लीग 2025 सोबत सहप्रायोजक म्हणून करार केला. हा करार म्हणजे शिक्षण आणि क्रीडा यांच्या समन्वयातून भविष्यासाठी सक्षम व्यक्ती घडविणे हा उद्देश आहे.
मूल्ये ही वर्गखोल्यांप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानावरही महत्त्वाची ठरतात. SGIS आणि टी 20 मुंबई लीग यांच्यातील संबंध हे युवा मनांना शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात प्रेरणा देण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, "आम्हाला टी २० सामन्यांसाठी मुंबई लीगसोबत सहयोग करण्यात अभिमान वाटतो, क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये प्रतिभा, महत्त्वाकांक्षा आणि सांघिकता या मूल्यांचा विकास होतो. हीच मूल्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो. भारतातील कमी कालावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ओळखले जाते. देशभरातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रतिष्ठित असणाऱ्या या टी २० मुंबई लीगसोबतच्या या भागीदारीमुळे, क्रीडा क्षेत्रामधील अनेक चांगल्या क्रिकेट खेळाडूंना वाव मिळणार आहे. यातील एखादा भविष्यातील भारतीय क्रिकेट टीमचे नेतृत्व करेल. आमची ही भागीदारी फक्त एक करार नाही, तर पुढील पिढीला मैदानावर आणि मैदानाबाहेरही मोठे स्वप्न पाहण्यासाठी, शिस्तबद्ध राहण्यासाठी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी दिलेली एक खूप मोठी संधी आहे.
टी २० मुंबई लीगचा हंगाम 3, हा 4 जून ते 12 जून २०२५ या कालावधीत डी. वाय. पाटील स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल, ज्यात देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचकारक सामने होतील. या लीगमध्ये आठ दमदार संघ आहेत. त्यांचे 23 सामने असतील, जे नऊ दिवसांत खेळवले जातील. उपांत्य फेरी व अंतिम सामना अनुक्रमे 10 आणि 12 जून रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे.