मुलींना सक्षम व आरोग्यदायी होण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया : मंत्री हसन मुश्रीफ

मुलींना सक्षम व आरोग्यदायी होण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचे प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

         

गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरण नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते.  

मुश्रीफ म्हणाले, देशात दर 8 मिनिटांनी एक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे. या कर्करोग मुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे. मुलींच्या शरीरावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. गडहिंग्लज, उत्तुर भागातील मुलींनी लसीकरण करून घ्यावे. शिक्षक पालकांनी शंका निरसन करून लसीकरणासाठी आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

आशीर्वाद आणि पुण्याई...!

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या 35- 40 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सामाजिक बांधिलकी म्हणूनच काम केले. एखादी मोहीम किंवा उपक्रम हाती घेतल्यानंतर मी मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करतो. त्याचा परिणाम म्हणूनच गोरगरिबांचे आशीर्वाद आणि पुण्याई सतत माझ्या पाठीशी असते. 

यावेळी अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवडे, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेत शेळके, आजरा तहसीलदार समीर माने, गडहिंग्लज मुख्याधिकारी देवानंद डेकळे, गट शिक्षणाधिकारी  हलबागोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत, तसेच वैद्यकीय, महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील मुख्याध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजू खणगावे, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा मंजुषा कदम, शर्मिली पोतदार, नगरसेविका  रेश्मा कांबळे, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, रफिक पटेल, प्रकाशभाई पताडे, बाळासाहेब घुगरी,  लक्ष्मी घुगरी, डॉ. बेनिता डायस, हारुण सय्यद, नरेंद्र भद्रापूर, सिद्धार्थ बन्ने आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी अधिष्ठता डॉ.मोरे व यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी कर्करोगमुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लसीविषयी माहिती देताना उपस्थितांचे शंका निरसन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. स्वागत माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी केले.