चार दिवस श्री जोतिबा मूर्तीचे दर्शन बंद

चार दिवस श्री जोतिबा मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर : चार दिवस दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मूर्तीचे दर्शन बंद राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.

जोतिबाच्या मूळ मूर्तिवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांकडून ही प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून 24 जानेवारीपर्यंत मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. डोंगरावर येणाऱ्या भाविकांना कासव चौकात उत्सवमूर्ती आणि कलशाचे  दर्शन घेता येणार आहे.