HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संख्याशास्त्राचे उपयोजन ही एक कला: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

संख्याशास्त्राचे उपयोजन ही एक कला: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर : संख्याशास्त्र हा विषय विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडित आहेच, पण त्याबरोबरच ती एक कला सुद्धा आहे, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पीएम-उषा पुरस्कृत ‘वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन तसेच त्यानंतर झालेल्या प्रथम सत्रात संबोधित करताना कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

संख्याशास्त्र या विषयामध्ये करिअरच्या अनेक संधी असून संख्याशास्त्रज्ञांना विविध क्षेत्रांत उज्ज्वल भवितव्य असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिकलेल्या प्रत्येक सिद्धांताचा आयुष्यात कोठे ना कोठे उपयोग होतोच. विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि आकलन यापलिकडे जाऊन त्याच्या उपयोजनाच्या अनुषंगाने विचारचिंतन करण्याची आवश्यकता आहे. विषयात पारंगत होण्यासाठी आधी चांगला श्रोता बनण्याची सवय लावून घ्यावी. आपल्यासमोर केवळ माहितीचा संच आला, तरी त्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्षापर्यंत कसे पोहोचावयाचे, ही एक कला आहे. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या युगात डेटा विश्लेषणाला मोठेच महत्त्व आले आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण शिकण्याला आणि कौशल्य विकासाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे.

आपल्या व्याख्यानामध्ये कुलगुरूंनी संख्याशास्त्राच्या इतिहासातील अनेक रंजक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना विषय सोपा करून सांगण्यावर भर दिला.

कार्यशाळेस नाशिक विभागाच्या सांख्यिकी सहसंचालक डॉ. सरिता यादव, डॉ. ए.ए. कलगोंडा, डॉ. प्रकाश चौगुले, डॉ. संतोष सुतार, डॉ. एस. के. गांजवे, डॉ. एस. एम. पाटील,  डॉ. पी.वाय.पाटील, डॉ. एन. एच. जाधव, डॉ. पी. एस चौगुले, डॉ. व्ही. व्ही. कोष्टी,  डॉ. ए. व्ही. दोरूगडे,  डॉ. एस. के. पोवार, डॉ. आर. एच. वळीव, डॉ. एस. पी. पाटील आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.