तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अद्ययावत केलेल्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षाचे उद्घाटन

तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अद्ययावत केलेल्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षाचे उद्घाटन

वारणानगर प्रतिनिधी : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील नूतनीकरण झालेल्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षाचे उद्घाटन आदरणीय संग्राम पाटील साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर, मारवलस इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.या उद्घाटनप्रसंगी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर,डॉ. एस. एम. पिसे, अधिष्ठाता, डॉ. डी. एन. माने, प्राचार्य, , सर्व विभाग प्रमुख, तसेच ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. जे.पाटील, सहयोगी ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. आर. सी. शिक्केरी, सर्व विभागाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयक व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी संग्राम पाटील साहेब यांनी नूतनीकरण झालेल्या कक्षाची पाहणी केली आणि महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली व विशेष कौतुक केले.

महाविद्यालयातील प्लेसमेंट कार्यप्रणाली आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट बाबत समाधान व्यक्त करत, त्यांनी महाविद्यालयाने औद्योगिक क्षेत्रातील बदलांना अनुसरून केलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले. भविष्यात नोकरीसाठी महाविद्यालयाला आवश्यक सहकार्य करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील प्रगतीशील कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.