HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या तक्रार निवारणाकरिता तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन

जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या तक्रार निवारणाकरिता तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकारी चळवळीमध्ये वाढत्या सहकारी संस्थांच्या तक्रारीची संख्या व न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. संस्थांच्या समस्यांचा जलदगतीने निपटारा होणे आवश्यक आहे. या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान 100 दिवसांच्या विशेष मोहिमेतंर्गत तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर या कार्यालयाच्या अधिनस्त असणा-या उपनिबंधक, सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत तालुका स्तरावर सहकारी संस्थांच्या तक्रार निवारणाकरिता  4 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात विविध प्रकारच्या 13 अजार पेक्षा जास्त सहकारी संस्था असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीची व्याप्ती पाहता सहकार पंढरी म्हणून जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात नागरी सहकारी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था याबरोबरच औद्योगिक संस्था व साखर कारखाने, सूतगिरण्या, खरेदी विक्री संघ, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन संस्थांचे जाळे पसरलेले आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत आहे. त्या संस्थांच्या माध्यमातून सभासदांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देवून सभासदांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य सहकार चळवळीतून होत आहे. 

प्राप्त होणा-या अर्जाबाबत एक महिन्याच्या आत निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे. ज्या सहकारी संस्थांच्या काही अडचणी व प्रलंबित कामे असतील त्यांनी संबंधित संस्थेचे मुख्यालय असलेल्या तालुकास्तरावरील शिबीरामध्ये उपस्थित राहून आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.