HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डीकेटीई येथे प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

डीकेटीई येथे प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

इचलकरंजी (प्रतिनिधी) - डीकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेटीईच्या प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी डीकेटीईचे आमचे दादा कार्यक्रम समिती व एनएसएस विभाग, सिनर्जी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, मिरज, नागरी सेवा आरोग्य केंद्र, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबीरात ३५० हून अधिक स्टाफवर मोफत रोगनिदान करण्यात आले. याचबरोबर कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्टाफसाठी हाफ पिज क्रिकेट स्पर्धा देखील मोठया दिमाखात संपन्न झाल्यानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते सदर क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस समारंभ पार पडला.

आरोग्य शिबीराची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, ट्रस्टी डॉ. ए.बी.सौंदत्तीकर, डायरेक्टर प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या शिबीरामध्ये संस्थेच्या वतीने कल्लाप्पाण्णा आवाडे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मनोकामना व्यक्त केल्या. यानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. 

या शिबीरामध्ये इसीजी, नेत्र तपासणी, दंत तापसणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, वजन, प्रोस्टेट, अशा अनेक तपासण्या करुण टी.टी. चे इंजेक्शन मोफत देण्यात आले. त्याचबरोबर यावेळी उपस्थितांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाला. या शिबीराच्या आयोजना बद्दल सर्व स्टाफनी समाधान व्यक्त केले. प्रा. सुयोग रायजाधव,श्रीकांत बेडक्याळे यांनी संयोजन प्रतिनीधी म्हणून काम पाहिले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी राहूल जगताप, प्रितम पाटील, किरण लंगोटे, निरंजन शेटटी, दिपक जाधव, दत्ता पाटील यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले.  

यावेळी महागाव कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत, डी.वाय.पाटील सीएसई चे प्रा. डॉ. बी.डी.जितकर व वसंतदादा पाटील मॅनेजमेंट एमसीए च्या विभागप्रमुख व्ही.एस.जाधव, सोशल डीन व एनएसनएस विभागप्रमुख सचिन कानिटकर, सर्व विभागप्रमुख यांचेसवे सिनर्जी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल,मिरज यांच्या हॉस्पिटलची संपूर्ण टीम उपस्थित होती.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.