HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

कागल प्रतिनिधी : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस कागल,गडहिंग्लज ,उत्तूरसह गावोगावी कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा केला.

गावागावी शाळा,अंगणवाडी, मूकबधिर शाळा, वृद्ध सेवा आश्रम या ठिकाणी खाऊ,शालेय साहित्य वाटपासह भोजन वाटप करण्यात आले. कागल व मुरगुड येथे रुग्णांना फळे वाटप केली.

  श्रीराम मंदिर मधील सभागृहात सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती झाली. चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साडेचारशे अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भावविश्व रेखाटले.मोफत डोळे तपासणी शिबीरात सव्वाशेहुन अधिक रुग्णांची तपासणी केली. तर सत्तर जणांनी रक्तदान केले. घोडागाडी शर्यतीचेही आयोजन केले.

कागल व मुरगुड येथे राजे फाउंडेशनच्या वतीने पीएम विश्वकर्मा ई -श्रम व आभा कार्ड यांच्या मोफत नोंदणी कॅम्पलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने आयोजित घोडागाडी व घोडा पळविणे स्पर्धेत सत्तर स्पर्धकांनी भाग घेतला. सवलतीच्या दरात पासपोर्ट काढण्याच्या सुविधेचा त्रेचाळीसजणांनी नोंदणी केली.

   राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती, वाढदिवस गौरव समिती, विविध संस्था-संघटना तसेच राजे प्रेमी कार्यकर्त्यांकडून या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले.

            

मतीमंद व इतर चिमुकल्यांकडून केक कापून घाटगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

यावेळी चित्रकला स्पर्धेसाठी मतिमंद व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांनी केक कापून घाटगे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना केक व खाऊ वाटप केले. तसेच कागल शहरात घरोघरी केक वाटप केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.