अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची पुस्तकांची गुढी
मलकापूर प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाहुवाडी तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत रेडकर यांनी ज्ञानाची गुढी उभारुन विधायक उपक्रमातून गुढीपाडव्याचा सण साजरा केला. गुडी पाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने गुढी पाडव्याला विविध उपक्रम घेतले जातात व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.अनिसचे पदाधिकारी असलेले चंद्रकांत रेडेकर यांनी पारंपरिक सणाला नवविचारांचा आयाम दिला. पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्याऐवजी त्यांनी पुस्तकांची गुढी उभारत त्यांनी ज्ञानाच्या महत्व पटवून देण्याचा संदेश दिला. गेली १५ वर्षे वाचनालयाच्या माध्यमातून ते वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र अंनिस च्या माध्यमातून विवेकी विचारांचा प्रसार करत आहे. त्यांच्या या गुढीचे तालुक्यातून स्वागत करण्यात आले आहे.