चावरे माध्यमिक विद्यालयात कारगिल विजयी दिन साजरा
परशुराम घोरपडे / किणी, प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील चावरे येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ चावरे संचलित चावरे माध्यमिक विद्यालय चावरे आणि न्यू मॉडेल इंग्लिश मेडियम स्कूल चावरे यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजयी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने चावरे गावातील 27 आजी-माजी जवानांचा विद्यालयाच्या वतीने फेटा बांधून सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. बोराडे हे होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर साहेब उपस्थित होते. यावेळी बोलताना तळेकर यांनी शाळेने अल्पावधीत मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे कौतुक केले. आर्मीमध्ये राहून खडतर प्रवास करून या जवानांनी देशसेवा केलेली असते म्हणून या सर्व जवानांचा आपण सन्मान करणे आवश्यक आहे असल्याचे ते यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांनी भविष्यात आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करावी असे आवाहनही त्यांनी केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. बोराडे सर यांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श व्यक्तिमत्व आणण्याचा विद्यालय प्रयत्न करत असते तसेच हे ग्रामीण भागातील विद्यालय असून याठिकाणी येणारे विद्यार्थी शेतीमधील कामे करून शिक्षण घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे ही विद्यालयाची जबाबदारी असल्याचं म्हटले.
सत्कारमूर्तीं कॅप्टन गणपतराव घोडके यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांच्या समोर मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एस. सनदे यांनी केले तर विभागप्रमुख ए. एस. माळी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
या कार्यक्रमासाठी चावरे गावचे सरपंच उदयसिंह पाटील, पोलीस पाटील दिलीप महाडिक, उपसरपंच मकरंद बोराडे, वसंत घोडके, उमराव निकम, राजाराम वाडीकर, महिपती निकम, सुदाम घोडके, शंकर निकम, लक्ष्मण सुतार गोरख पाटील, सर्जेराव पचिंबरे, हिम्मत घोडके, सदाशिव घोडके, मारुती घोडके, रामचंद्र चव्हाण, शामराव गायकवाड, साताप्पा कांबळे, हिंदुराव निकम त्यांच्यासह चावरे गावातील सर्व आजी-माजी जवान, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.