HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डॉ. आर. व्ही. पोवार यांचे युपीएससी परीक्षेमध्ये यश

डॉ. आर. व्ही. पोवार यांचे युपीएससी परीक्षेमध्ये यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे चे माजी विद्यार्थी व सध्या याच महाविद्यालयात कृषी अवजारे व शक्ती (FMPE) विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे डॉ. आर. व्ही. पोवार यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात वरिष्ठ कृषी अभियंता म्हणून निवड झाली आहे. 

         संघ लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमधून निवड करण्यात आलेल्या ७ अभियंत्यामध्ये सर्वात कमी वयात हे यश मिळवण्याचा मान डॉ. पोवार यांना मिळाला आहे. या परीक्षेतून निवडले जाणारे उमेदवार देशाच्या कृषी संशोधन आणि विकासासाठी महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

  डॉ. आर. व्ही. पोवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे येथून बी. टेक. ॲग्री. पदवी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून एम. टेक. ॲग्री हे पदव्युत्तर शिक्षण व डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून सुर्वण पदकासह पीएचडी प्राप्त केली. विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच संशोधनपर कामासाठी ओळखले जातात. 

डॉ. पोवार यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांना दिले. तसेच डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्री महाविद्यालय येथील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापनाचा अनुभव खूप उपयोगी पडला. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे चांगले यासह मिळवता आले. यापुढे कृषी अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीत नवनवीन संशोधन करून भारतीय कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देण्याचा मानस असल्याचे डॉ. पोवार यांनी सांगितले.

प्राचार्य, डॉ. एस. बी पाटील म्हणाले, डॉ. पोवार यांनी युपीएससी परीक्षेत मिळवलेले यश महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा दाखला आहे. त्यांचे हे यश महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तसेच बी. टेक. ॲग्री साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डॉ. पोवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.