तुरंबे येथील एकाची 28 लाख रुपयांची फसवणूक

तुरंबे येथील एकाची 28 लाख रुपयांची फसवणूक

राधानगरी प्रतिनिधी :  राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील समीर मेहबूब पटेल यांनी आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये केली आहे.तुरंबे येथील उस्मान गणी जहांगीर जमादार , इनुस जहांगीर जमादार ,सोहेल कलंदर बेगुलजी यांनी ऑगस्ट 2022 ते आजतागायत वेळोवेळी रक्कम घेऊन एकूण 28 लाख 65 हजार 75 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद पटेल यांनी दिली आहे . 

             यातील संशयीत आरोपी उस्मान गणी जहांगीर जमादार व  सोहेल कलंदर बेगुलजी यांनी फिर्यादी यांना भेटुन आपली UJ एटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. त्यामध्ये गाडी, दागिने, घराचे मटेरीयल, मोबाईल व इतर वस्तु कमी दरात देत असतो किंवा गुंतवणुक केलेल्या रक्कमेमध्ये जास्त पैसे देत असतो असे सांगीतले .यावर फिर्यादी याने आपल्याकडील रक्कम वेळोवेळी कंपनीमध्ये गुंतवली तसेच काही वेळा गाडी व इतर व्यवहारासाठीही रक्कम दिल्याची नोंद फिर्यादीमध्ये केली आहे .आपल्याला काही परतावा मिळत नाही असे वाटल्यानंतर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता पैसे मागीतले तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी देण्यात आल्याने पटेल यांनी राधानगरी पोलिसांमध्ये संबंधित घटनेची तक्रार केली आहे संबंधित घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत .