तांत्रिक सेवाप्रवेश नियमावलीत बदल - डॉ. विनोद मोहितकर

तांत्रिक सेवाप्रवेश नियमावलीत बदल - डॉ. विनोद मोहितकर

कोल्हापूर / प्रतिनिधी

राज्य शासनाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन मध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक,अ तांत्रिक कर्मचारी भरती होण्याची शैक्षणिक सेवाप्रवेश नियमावली पारंपारिक १९६६-६७ सालची तशीच होती. त्यामुळे नव्याने सहाय्यकारी पदांची भरती करताना अडचण निर्माण होत होती. त्यामध्ये सुधारित नवे बदल करून आधुनिकता साकारली आहे.

विविध तांत्रिक,अतांत्रिक व कार्यालयीन प्रशासकीय पदांचा आढावा सुरू असून, शासन मान्यता प्राप्त होताच नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयात पदनिर्मिती करण्याचा प्रयत्न करू असे स्पष्टता तंत्रशिक्षण संचालनायाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी अधिकारी व कर्मचारी राज्य शिक्षक कल्याणकारी संघटना व मध्यवर्ती  संघटनेच्या भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय गर्गे,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत सावंत, प्रा.पियुष मालपुरे,प्रबंधक सौ.मेहजबिन म्हैशाळे,ज्येष्ठ निदेशक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता सुतार,राज्य टेक्निकलचे विजय माणगावकर,वल्लभ पाटोळे, संजय पाटील,अतुल साने,अनंत माने,यशवंत गुरव,सुनील बाबर,वासुदेव पाटील,सतीश मधाळे,डॉ.मोहनकुमार हंपाली, तानाजी पवार,अविनाश मुधोळकर, इत्यादी उपस्थित होते.