१४ ते २० फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरातील पॅव्हेलियन ग्राउंड, कसबा बावडा इथं या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे.या स्पर्धेचा अंतिम सोहळा २०फेब्रुवारी रोजी प्रकाश झोतात खेळविला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजेश क्षीरसागर फोडेशन भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लोकनाथ चषक...
कोल्हापूर प्रतिनिधी: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलय.
क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं कसबा बावडा विभागातर्फे "लोकनाथ चषक" भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय.
१४ ते २० फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरातील पॅव्हेलियन ग्राउंड, कसबा बावडा इथं या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे.या स्पर्धेचा अंतिम सोहळा २०फेब्रुवारी रोजी प्रकाश झोतात खेळविला जाणार आहे.
आज भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लोकनाथ चषकाचे २०२३ चे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित अध्यक्ष समिती युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शहर समनवयक सुनील जाधव ,उप जिल्हाप्रमुख उदय बाबा भोसले. किशोर घाडगे.जिल्हा समिती सदस्य अंकुश निपानिकर. आदर्श जाधव, सचिन पाटील ,रोहन उलपे , आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते