अरविंद पाटील यांचे कोजिमाशि साठी योगदान संस्मरणीय - दादासाहेब लाड.
पत्रकार- सुभाष भोसले
सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेचे सीईओ अरविंद पाटील यांनी सुमारे ३९ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावून संस्थेला यशोशिखरावर पोहचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे गौरवोदगार कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक, शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी काढले. अरविंद पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार कोल्हापुरी फेटा,सन्मानचिन्ह, शाल, गुछ देऊन ३०एप्रिल,२०२३ रोजी मुख्याध्यापक संघ सभागृहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून दादासाहेब लाड बोलत होते.याप्रसंगी अनेक मान्यवरांनी अरविंद पाटील यांच्या सेवेबद्दल गौरवोदगार काढले. कोजिमाशि पतसंस्थेत क्लार्क,वसुली अधिकारी,चिटणीस,सीईओ अशा विविध पदावर उत्कृष्ट सेवा बजावून संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली अरविंद पाटील यांनी योगदान दिले आहे अशा भावना व्यक्त केल्या.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कोजिमाशि पतसंस्था चेअरमन अनिल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम कवडे यांनी केले.आभार जयवंत कुरडे यांनी मानले.यावेळी कोजिमाशि व्हा.चेअरमन शरद तावदारे, संचालक डॉ. डी. एस. घुगरे, बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे, पांडुरंग हळदकर, दीपक पाटील,उत्तम पाटील,राजाराम शिंदे, श्रीकांत पाटील,प्रकाश कोकाटे,श्रीकांत कदम, मदन निकम, जितेन्द्र म्हैशाळे,सुभाष खामकर,राजेंद्र पाटील, मनोहर पाटील,सचिन शिंदे,अविनाश पाटील, ऋतुजा पाटील,शीतल हिरेमठ आदी संचालक तसेच माजी संचालक कैलास सुतार,गंगाराम हजारे,अरविंद किल्लेदार,जनार्दन गुरव,इडीपी ऑपरेटर नितीन शिंदे, कोजिमाशि पतसंस्था कर्मचारी वर्ग,पन्हाळा माजी नगराध्यक्ष विजय पाटील,अरविंद पाटील यांचे कुटुंबीय व नातेवाईक तसेच शिक्षण आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या उपस्थित होते.