दिवा ते मुंब्रा दरम्यान रेल्वे अपघात : ५ प्रवाशांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

दिवा ते मुंब्रा दरम्यान रेल्वे अपघात : ५ प्रवाशांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

ठाणे - दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावणाऱ्या फास्ट लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे ८ ते १२ प्रवासी खाली पडले. यामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, इतर जखमींवर जवळच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.

ही दुर्घटना सकाळच्या वेळेत, कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रवासी थेट ट्रॅकवर पडले, तर काहीजण स्थानक परिसरात पडल्याची माहिती मिळत आहे.

सध्या या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.