HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

धंगेकर म्हणजे पुण्यातील वाल्मिक कराड, 'या' कॉँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप ,ज्याची विचारधारा....

धंगेकर म्हणजे पुण्यातील वाल्मिक कराड, 'या' कॉँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप ,ज्याची विचारधारा....

पुणे : काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर रामराम करत रविंद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. धंगेकर सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अशातच काँग्रेस शहराध्यक्ष  अरविंद शिंदेंनी धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ससून, पब, ड्रग्स हे सगळे आंदोलन त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठीच केले यात कुठेही काँग्रेसचा झेंडा नव्हता. काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा मोठा दावा केला आहे. हा पुण्यातील वाल्मिक कराड असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.

ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नव्हती, पक्ष कुठच कमी पडला नाही. चारवेळा संधी दिली तरी गेले, मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने ३ वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ४ वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले.

काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे, त्यांना लीड घेता आल नाही. पक्षाने माझ्यासाठी काम करावं मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका ते घेत होते. यापुढे पक्षाला विनंती अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही काहीच नाही. हे संधीसाधूपाण करत आहेत आम्ही पक्षाला सांगितल्यचं शिंदेंनी म्हटलं आहे.

अनेकदा पक्षाच्या विरोधात काम करत आहेत असे सांगितल होतं. आम्ही कधीच त्यांच्यावर बोललो नाही. रस्त्यावर आम्ही उतरून काम केलं. देश राम मंदिर उत्सव साजरा करताना हे बाबरी मशीदवर बोलत होते विचारधारा नाही, यांना एका पार्टीची लाइन धरता येत नाही. कुठल्याच बैठकीला, आंदोलनांना येत नाहीत अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती त्यांना अनेकदा समज दिली पक्षाने मात्र बदल झाला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात. यांनी काय केलं नाही एक नगरसेवक केला नाही आम्हाला दुःख की अशा नाकर्त्यावर आम्ही विश्वास ठेवला, केवळ मतलबी राजकारण केलं. त्यांच्या टेंडर मध्ये प्रॉब्लेम म्हणून पक्ष सोडल्याचा आरोप शिंदेंनी केला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.