शिवाजी विद्यापीठातील प्रियंका पवारची जर्मनीतील हॅनोवर विद्यापीठामध्ये समर स्कूल प्रोग्रामसाठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागांतर्गत सुरू असलेल्या वैद्यकीय माहिती व्यवस्थापन या विषयामध्ये एम.एस्सी.द्वितीय वर्षात शिकणारी विद्यार्थीनी प्रियंका उल्हास पवार हिची जर्मनी येथील होशुल हॅनोवर युनर्िव्हसिटी ऑफ अप्लाइड सायन्स अँड आर्टस् येथे 12 मे ते 20 जून दरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल समर स्कूल प्रोग्राम फॉर क्लिनिकल रिसर्चसाठी निवड झाली आहे.
जर्मनी येथे क्लिनिकल रिसर्च क्षेत्रातील प्रशिक्षण आणि त्यामधील आंतरराष्ट्रीय स्थरावरील विविध संधी याबाबतचे प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी जर्मनीमधील प्रोफेसर कॉर्नेलिया फ्रॉम्के व इतर तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वैद्यकीय माहिती व्यवस्थापन हा कोर्स जीवरसायनशास्त्र अधिविभागामध्ये जून 2019 पासून सुरू असून या कोर्स करिता सर्व सायन्स, मेडिकल व फार्मसी विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
या निवडीबद्दल प्रियंका पवार हिचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, समन्वयक डॉ.कैलास सोनवणे, अधिविभागप्रमुख डॉ.पद्मा दांडगे, डॉ.नवनाथ कुंभार यांनी अभिनंदन केले.