प्रताप होगाडे यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करूण मत मांडणारा . समाजवादाचा सच्चा पाईक हरपला . होगाडे यांच्या पाऊल वाटेवर मार्गक्रमण करण ही स्वर्गीय प्रताप होगाडे यांना आदरांजली ठरेल अशा भावना सर्व पक्षीय सभेत व्यक्त केल्या गेल्या .
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वस्त्रोद्योग कृषि व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आणि अभ्यासू व्यक्तीमत्व वीज तज्ञ प्रताप होगाडे याचं सोमवारी अकस्मित निधन झालं . त्यांच्या निधनाबद्दल जिल्हा काँग्रेस कार्यालयात आदरांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती .
यावेळी समाजवादी कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी कॉम्रेड प्रताप होगाडे यांच्या प्रतिमेला फुले वाहून श्रध्दांजली वाहिली .महावितरण शेतकऱ्यांवर वीज चोरी वीज गळतीची रक्कम लादली जात असल्याच पुराव्यासह दाखवून देणारे व्यक्तीमत्व म्हणजे प्रताप होगाडे होय . सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करूण मत मांडणारा . समाजवादाचा सच्चा पाईक हरपला . होगाडे यांच्या पाऊल वाटेवर मार्गक्रमण करण ही स्वर्गीय प्रताप होगाडे यांना आदरांजली ठरेल अशा भावना सर्व पक्षीय सभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या . कॉम्रेड दिलीप पवार शशांक बावचकर, कॉम्रेड अतुल दिघे भाई बाबासाहेब देवकर ,प्रा टी एस पाटील ,
भारती पवार ,ॲड सुमेधा सबनीस शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार कॉम्रेड चंद्रकांत यादव राजेश लाटकर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष .विक्रांत पाटील ॲड . बाबा इंदुलकर कॉम्रेड शिवाजीराव परुळेक,मिथिली होगडे भारत लाटकर यांनी स्वर्गीय प्रताप होगाडे यांचा जीवन प्रवास मांडला .या शोकसभेला काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सरलाताई पाटील, दीपाताई पाटील ,, जेनिस प्रताप होगाडे, भरत रसाळे सर, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव संजय पोवार - वाईकर, राजेंद्र मुठाणे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शेकापचे बाबुराव कदम, भैया पाटील भुयेकर, ॲड सुरेखा सबनीस, चंद्रकांत पाटील, सुभाष शहापुरे, सचिन जमदाडे, आर जी तांबे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.