शरद आयटीआयमध्ये उद्या शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन

यड्राव (प्रतिनिधी) - यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे उद्या शुक्रवार ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवराज्याभिषेक दिन सोहळा कार्यक्रम उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साजरा होणार असून त्याचे उद्घाटन व्हिडिओद्वारे ऑनलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून सचिव स्वरुपा पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे उपस्थीत राहणार आहेत. शरद आयटीआयमध्ये कुटुंब प्रबोधन ह्या विषयावर प्रा. श्रीकांत माळकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. त्याचबरोबर विद्यालयात तंत्र प्रदर्शन होत आहे. यावेळी पारंपारिक खेळ लेझीम याचेही सादरीकरण होणार आहे.