चौथ्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेला सायबर कोल्हापूरमध्ये सुरुवात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये चौथ्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेला आज सुरुवात झाली. ही परिषद ICSSR कडून प्रायोजित आहे. श्रीलंका आणि मॉरिशसच्या शैक्षणिक संस्थांसोबत केलेल्या आंतरराष्ट्रीय सहयोगाचे विशेष महत्त्व या परिषदेला आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. रणजीत शिंदे यांनी भारतीय शिक्षणातील ऐतिहासिक दाखले देत गेल्या चाळीस वर्षांत उच्च शिक्षणाचा प्रवास कसा झाला हे सांगितले. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी यांनी जीवनातील शिक्षण, विशेषत: उच्च शिक्षणाच्या भूमिकेवर विचार मांडले. तसेच, विद्यार्थ्यांसाठी काही रंजक झेन गोष्टी सांगून मार्गदर्शन केले. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, जे विविध कारणांसाठी आपल्याशी संबंधित असतात. काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी, तर काही लोक आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, किंवा काही आपल्याला मदत करण्यासाठी येतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक विशिष्ट भूमिका असते, आणि त्यांचे अस्तित्व आपल्या जीवनाच्या प्रवासात महत्वाचे ठरते.
या प्रसंगी" सायबर च्या संशोधन जर्नलच्या UGC CARE सूचीतील प्रवेशाचे त्यांनी कौतुक केले.
उद्योजक सचिन शिरगावकर यांनी आपल्या औद्योगिक अनुभवावर प्रकाश टाकला, तसेच प्रदूषण, प्रशासन, आंतरराष्ट्रीय उलथापालथ आणि करोना मुळे बदललेल्या परिस्थितीवर मार्गदर्शन केले. त्यांनी हवामान बदलातील आव्हाने आणि इंधन क्षेत्रातील आधुनिक प्रयोगांवर चर्चा केली. इंधन क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये चालवत असलेल्या आधुनिक प्रयोगांबददल माहिती दिली. हवामान बदलातील आव्हाने डोळसपणे ओळखुन या समस्यांवर काम करण्याची तातडीने गरज त्यांनी समजावून सांगितली.
डॉ संजीवनी गिनी गददेरा यांनी महत्वाची वैश्विक आव्हाने विशद केली. सामाजिक आव्हानांपासुन ते तंत्रज्ञानापर्यंत अनेक अडथळ्यांची विस्तृत माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले डॉ. संजीवनी गिनीगद्दारा यांनी भविष्यातील विद्यापीठांच्या भूमिकेवर विस्तृतपणे चर्चा केली, तसेच आपल्या विद्यापीठातील मॉडेल फार्म्स आणि कृषी प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यापीठे कशी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात हे स्पष्ट केले.संचालक डॉ. एस. पी. रथ यांनी "क्वालिटी मॅनेजमेंट: सिक्स सिग्मा ते थर्टी-थ्री सिग्मा - एक भारतीय प्रवास" या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
डॉ. बिंदू मेनन, डॉ. पूजा पाटील, इंजि. डी. एस. माळी, डॉ. वर्षा रायनाडे, प्रा. मधुरा माने, प्रा. अमर एकल यांच्या उपस्थितीत तीन जर्नल्स आणि पाच पुस्तके प्रकाशित करण्यात आली.तीन जर्नल्स व पाच पुस्तके यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आली आहेत.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. प्रा. अनुराधा गायकवाड आणि प्रा. सोनाली सदरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. तर, प्रा. मधुरा माने यांनी आभार मानले.
या परिषदेला भारतातील ७२ विद्यापीठे आणि ११ आंतरराष्ट्रीय संस्थांकडून ३०४ शोधनिबंध सादर झाले आहेत, त्यापैकी १०४ निवडक शोधनिबंध ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सादर केले जातील.