भाजपने जातीवाद वाढवला! निवडणूका ईव्हीएमद्वारे घेण्यास विरोध...
श्रमिक मुक्ती दल, नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टी, हिंदी है हम हिंदोस्ता मारा, सत्यशोधक बहुजन आघाडी, सत्यशोधक डेमोक्रेटिक पार्टी यांच्यावतीने जातीअंत परिषद दिनांक 11(रविवार) रोजी घेण्यात आली.
परिषदेस श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना पाटणकर यांनी माणसांची ओळख माणूस म्हणून देण्यापेक्षा माणसाला जातींची ओळख दिली जाणे ही बाब समाजघातक आहे, अशा स्थितीत जात्यांध व धर्मांधांना नाकारल्याशिवाय जातिअंताचा लढा यशस्वी होणार नाही, त्यासाठी कृती कार्यक्रम राबवायला हवा असे सांगितले.
तसेच ईव्हीएमच्या काळात निवडून आलेल्या भाजप सरकारच्या काळात जातिवाद वाढला असून समाजात दुफळी निर्माण होत आहे. यातून धोक्यात आलेली लोकशाही वाचविण्यासाठी व घटनेतील अधिकार अबाधित राखण्यासाठी ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेण्यास विरोध करावा.त्यासाठी तीव्र लढा उभा करावा, असे आवाहन भटक्या विमुक्तांचे नेते "उपरा' कार डॉ. लक्ष्मण माने यांनी केले.
या जातिअंत परिषदेस हुमायून मुरसल, संपत देसाई, डॉ. भारत पाटणकर, डॉ. शरद गायकवाड, वाहरू सोनवणे, किशोर जाधव आदी. उपस्थित होत.