अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा - सुर्यकांत देशमुख

कोल्हापूर (प्रतिनिधी) - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा असे प्रतिपादन सूर्यकांत देशमुख यांनी केले. पिकांच्या नुकसानीबाबत विधानसभा निवडणुकीपुर्वी जाहीर नाम्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी. विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिले होते. ते सत्यात उतरावे अशा मागणीचे निवेदन भ्रष्टाचार जन आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावेळी ते बोलत होते.
'राज्यात मागील बन्याच दिवसापासुन थैमान घातलेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान होऊन, हातात आलेल्या पिकांची नासाडी झाल्याने व विकृती झाल्याने शेतक-याने शेत पिकासाठी केलेले संपूर्ण कष्ट वाया गेलेले आहे. व त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला असून याबाबत शासनाने तात्काळ मदत जाहीर करणे गरजेचे आहे.शासनाने सहकार्य करत असताना अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता मदत जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष उत्तम पोवार, जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत देशमुख, नेताजी कांबळे, रत्नमाला कांबळे, गोविंद आवळे, प्रशांत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.