शंभर वर्षांवरील मतदारांचा सन्मान करा : जिल्हाधिकारी येडगे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येडगे यांनी गडहिंग्लजमधील ईव्हीएम स्ट्राँगरूम, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या भडगावातील मतदान केंद्र, मतदान साहित्य देवघेवीचे केंद्र एम. आर. हायस्कूल व भडगाव केंद्रशाळेतील सहाही मतदान केंद्रांना भेट देवून पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी निवडणुकांच्या आधारावर एक विशेष उपक्रम राबवण्याचा आदेश दिला आहे. यात शंभर वर्षांवरील मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत घेऊन येण्याची व्यवस्था करण्यासह प्रशासनातर्फे त्यांचा सन्मानही करावा', अशी सूचना स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना केली. तसेच प्रत्येक गावातील ८० वर्षांवरील मतदारांबाबत विशेष मोहीम राबवून स्वतंत्र यादी तयार करावी. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी असे येडगे यांनी बीएलओ यांना सांगितले.
मतदान केंद्राला भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना माहिती देताना तहसीलदार ऋषिकेत शेळके. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, राजेंद्र गवळी, रूपाली कांबळे आदी उपस्थित होते.