HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे कोल्हापुरात मोठ्या उत्साहात स्वागत

भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे कोल्हापुरात मोठ्या उत्साहात स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (ओबीसी मोर्चा) संजय गाते यांचा गौरव समारंभ खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नागाळा पार्क येथील भाजपाच्या नूतन कार्यालयात पार पडला.

राज्यातील बावन्न टक्के ओबीसी जनतेला भाजपा सरकारच्या प्रयत्नातून आरक्षण मिळाले असून ओबीसी समाज सक्षम करण्यासाठी पक्ष नेतृत्व कटिबध्द असल्याचे यावेळी संजय गाते यांनी सांगितले.

तसेच यावेळी महेश जाधव साहेब (प्रदेश सचिव, भाजपा), राहुल चिकोडे (जिल्हाध्यक्ष, भाजपा कोल्हापूर), नाना कदम (कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रभारी) , गायत्री राऊत (जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा), संदीप कुंभार (प्रदेश सदस्य, भाजपा) यांची मनोगते झाली.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभेत आणि लोकसभेत भाजपाचे जास्त ओबीसी प्रतिनिधी असल्याचे सांगून पक्ष ओबीसींसाठी सर्व कार्य करत असल्याचे त्यांनी विषद केले.

याप्रसंगी श्री प्रल्हाद सायकर साहेब, सचिन लंबाते, डॉ आनंद गुरव (जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा कोल्हापूर), महेश यादव (जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा कोल्हापूर), विद्या बनछोडे. (जिल्हाध्यक्षा, भाजपा ओबीसी महिला मोर्चा कोल्हापूर), विद्या बागडी, वर्षा कुंभार, संध्या तेली ,छाया ननवरे, 

यांच्यासह इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.