‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत उद्या विद्यापीठात संपत देसाई यांचे व्याख्यान

कोल्हापूर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत उद्या, गुरूवारी (दि. २) सकाळी १० वाजता शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक संपत देसाई यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित उद्धार आणि समाजातील जाती निर्मूलन करण्यासाठी व्यतीत केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा हाच जाती निर्मूलन विचार आणि महाराष्ट्रातील जातनिर्मूलन लढ्यांचा इतिहास या अनुषंगाने आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई मांडणी करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील. तरी या व्याख्यानासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.