मनपा शाळेत युनियन बँकेकडून साहित्य वाटप.

मनपा शाळेत युनियन बँकेकडून साहित्य वाटप.

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त झालेल्या जयंतीच्या निमित्ताने युनियन बँक ऑफ इंडियाच्या एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा क्रमांक 42 येथे गरजू 40 ते 50 शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग शैक्षणिक साहित्य व गणवेश साहित्याचे वाटप करण्यात आले.

बसवा हिरेमठ बँकेचे जनरल मॅनेजर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे विशाल सोनवणे लखन साळवे उपस्थित होते.

यावेळी 42 नंबर शाळेच्या मुख्याध्यापिका टोणपे यांनी स्वागत केले बँकेचे या समाजसेवी उपक्रमाचे कौतुक का बरोबरच या कामी विशेष प्रयत्न करणारे विजयकुमार कांबळे यांचेही कौतुक करण्यात आले या निमित्ताने निबंध वकृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आई-वडील शाळेचे व शिक्षकांचे नाव करावे यासाठी बँकेकडून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन बँकेचे जनरल मॅनेजर हे रिमिक्स साहेब व सोनवणे साहेब यांनी कार्य करण्याचे आश्वासन दिले

शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.