HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

महाकुंभमेळयात चेंगराचेंगरी ; मोदींनी केला योगी आदित्यनाथ यांना फोन

महाकुंभमेळयात चेंगराचेंगरी ; मोदींनी केला योगी आदित्यनाथ यांना फोन

प्रयागराज : महाकुंभात आज मौनी अमावस्येला शाही स्नान आहे. यादरम्यान संगम घाटावर एक मोठी दुर्घटना घडली. भाविकांची मोठी गर्दी झाली आणि यादरम्यान अफेवेमुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये काही जणांचा मृत्यू झाला. 50 हून अधिकजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

नरेंद्र मोदी यांनी केला सीएम योगी आदित्यनाथ यांना फोन

कुंभमेळ्यातील या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएम योगी आदित्यनाथ यांना फोन केला. नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांनी देखील योगी आदित्यनाथ यांना  फोन करून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांना दोनदा फोन करून घटनेचे सर्व अपडेट घेतले आहे. त्यांनी सीएम योगी यांच्याशी एका तासामध्ये दोनदा फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली. या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी सीएम योगी यांना तातडीने आणि लवकरात लवकर मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अचानक गर्दी वाढल्याने  दुर्घटना 

भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केलीये. सीएम योगी देखील कुंभमेळ्यातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन आले. अचानक गर्दी वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. अनेक आखाड्यांनी शाही स्नान रद्द केले आहे. मौनी अमावस्येला भाविक मोठ्या संख्येने जमले होते.

भाविकांनी संगम घाटावरच स्नान करण्याचा आग्रह धरू नये

महाकुंभातील चेंगराचेंगरीमध्ये नेमका किती जणांचा मृत्यू झाला, याचा आकडा अजून स्पष्ट होऊ शकला नाहीये. सकाळी 10 वाजता आनंद आखाड्यात स्मृती सभा होईल, असे सांगण्यात आलंय. अध्यात्मिक गुरू देवकीनंदन टागोर यांनी म्हटले की, मी संगम घाटावर गेलो नाही कारण तिथे खूप गर्दी आहे. मी भाविकांना आवाहन करतो की त्यांनी केवळ संगम घाटावरच स्नान करण्याचा आग्रह धरू नये. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.