... तर घराच्या किमती १० टक्के वाढतील
नवी दिल्ली : केंद्र सरकारने फ्लोर स्पेस इंडेक्स आणि अतिरिक्त फ्लोर स्पेस इंडेक्स शुल्क जीएसटीच्या कक्षेत आणलयास घरांच्या किमती १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच देशभरातील रिअल इस्टेट विकासकांनी केंद्र सरकारला फ्लोर स्पेस इंडेक्स आणि अतिरिक्त फ्लोर स्पेस इंडेक्स शुल्क जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची विनंती केली असून बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना असलेल्या क्रेडाईने सरकारच्या या नव्या नियमाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
क्रेडाई या संस्थेने अर्थ मंत्र्यांना पाठविलेल्या पात्रात म्हंटले आहे कि केंद्र सरकारने एफएसआय शुल्कावर १८ टक्के जीएसटी लागू केल्यास घराच्या किमती १० टक्के पर्यंत वाढू शकतात. स्वस्त घरांचे प्रकल्पही महागतील. परिणामी मध्यमवर्गीयांवर अधिक परिणाम होईल, ज्यांच्यासाठी घर खरेदी करणे आधीच एक आव्हान आहे. म्हणूनच सरकारने एफएसआय शुल्कावर १८ टक्के जीएसटी लावण्याच्या पस्तावावर पुनर्विचार करावा.