Union Budget 2025 : Live अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2025 : ठळक मुद्दे
भारतीय टपाल यंत्रणेबाबत मोठा निर्णय
भारतीय टपाल यंत्रणेचे मोठ्या लॉजिस्टिक केंद्रांत रूपांतर करणार असल्याचे अर्थसंकल्पात अर्थमंकत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
विकसित भारतासाठी अर्थसंकल्प: निर्मला सीतारमन
आम्ही विकसित भारतासाठी अर्थसंकल्प सादर करत आहोत. निर्मला त्यांच्या सरकारच्या कामगिरीची गणना करताना गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांची विशेष काळजी घेण्याबद्दल बोलत आहे.
आरोग्य आणि रोजगारावर भर
आरोग्य आणि रोजगारावर जास्त लक्ष दिले जाणार, पुढील 5 वर्ष विकासाची संधी देणार असल्याचे निर्मला सितारामन यांनी म्हटले.
खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट आहे आणि खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर असणार आहे.
कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना
एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने’चा फायदा
अर्थव्यवस्थेला गती देणार
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अर्थव्यवस्थेला गती देऊ.
निर्यात वाढवण्यावर भर
केंद्रीय अर्थसंकल्पात निर्यात वाढवण्यावर भर - सीतारामन
आमचे लक्ष 'GYAN'वर आहे - निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष 'GYAN'वर आहे. अर्थमंत्री म्हणाले की, आम्ही गेल्या 10 वर्षात बहुआयामी विकास केला आहे. (G-गरीब, Y- युवा, A- अन्नदाता, N- नारी शक्ति)
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना
राज्यांच्या साह्याने ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने’ला बळकटी : सीतारामन
भारताला जगाचे फूड बास्केट बनवण्याचे उद्दिष्ट
अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की सरकारचा उद्देश भारताला जगाचे फूड बास्केट बनवण्याचे आहे.
36 जीवरक्षक औषधांवर कस्टम ड्युटी हटवली
अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. दुर्धर आजारांसाठी ३६ नवी औषधांचा सीमाशुल्कमुक्त केल्याची घोषणा. ६ लाईव्ह सेव्हिंग औषधांवर ६ टक्के कस्टम ड्युटी लागणार आहे
नवीन आयकर बिलासंदर्भात मोठी अपडेट
पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जाहीर केले आहे.
व्हिजासाठीचे नियम सोपे करणार
व्हिजासाठीचे नियम सोपे करणार असून LIVE व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार,भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार.
ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि अणुऊर्जा मिशन
विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन – 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट उर्जा उत्पादनाचं लक्ष्य आहे. या अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि राज्यांतर्गत पारेषण क्षमतेला चालना देण्याचा प्रस्ताव आहे. खाजगी क्षेत्रासोबत भागीदारी करून हे पूर्ण केले जाईल.
अर्थमंत्र्यांनी उडवला घोषणांचा बार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, क्रेडिट कार्ड कर्जासाठी 5 लाखांची सीमा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लेखांवरून पाच लाख रुपयेपर्यंत वाढवली आहे.
-
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा
ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखपर्यंत वाढवली.7 टेरिफ दर काढण्याचा निर्णय
सरकारने 7 टेरिफ दर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त 8 टॅरिफ दर राहतील. समाजकल्याण अधिभार काढण्याचा प्रस्ताव आहे.
नवीन टॅक्स स्लॅबवार्षिक ४ लाख ते ८ लाख रुपये यामध्ये उत्पन्न असलेल्यांना ५ टक्के प्राप्तिकर लागूपॅन क्रमांक करदात्यांसाठी घोषणा
पॅन क्रमांक नसलेल्या करदात्यांसाठी वाढीव दराने टीडीएस लावला जाणार. -
पगारदारांची क्रयशक्ती वाढणार
पगारदारांची क्रयशक्ती वाढणार असल्याने ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स निगडित कंपन्यांच्या समभागांत तेजी येणार असल्याची घोषणा -
भारत ट्रेड नेटद्वारे आंतरराष्ट्रीय निर्यत सुलभीकरण
भारत ट्रेड नेट' (BTN) ची स्थापना केली जाईल, जी व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा उपायांसाठी एकात्मिक व्यासपीठ असेल. BTN ची रचना आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार केली जाईल. -
सुरिमी माशांसंदर्भात मोठी घोषणा
सुरिमी माशांवरील प्राथमिक सीमाशुल्कात कपात केली जाईल. -
New Tax Slabमध्ये असा आहे नवीन स्लॅब दर
New Tax Slabमध्ये नवीन स्लॅब दर रुजू झाला. -
-
अर्थसंकल्पात आतापर्यंतच्या मोठ्या घोषणा
• पुढील ६ वर्षे मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित.
• कापसाचे उत्पादन वाढवण्याचे ५ वर्षांचे ध्येय, यामुळे देशाचा कापड व्यवसाय मजबूत होईल.
• किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येईल.
• बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल.
• लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील.