महावीर महाविद्यालयात 'काळोखाचा राजपूत्र' व 'सप्तरंग' पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न...

महावीर महाविद्यालयात 'काळोखाचा राजपूत्र' व 'सप्तरंग' पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न...

        महावीर महाविद्यालय कोल्हापूर- माजी विद्यार्थी संघ आणि मराठी वाङ्मय मंडळ बी.ए.बी.एड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्त महाविद्यालयातील ॲम्पी थिएटर येथे पुस्तक प्रकाशन सोहळा गुरुवारी पार पडला. डॉ सुप्रिया आवारे लिखित काळोखाचा राजपुत्र आणि पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी लिखित सप्तरंग कवितेचे ही दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात यावेळी करण्यात आलं. 

         सप्तरंग पुस्तक लिहिण्याचा उद्देश समाजातील समस्यांवर प्रकाश टाकणे व त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे, समाजात वावरत असताना अशा पीडित लोकांच्या समस्यांची जाणीव लोकांना व्हावी व त्यांनी अशा विषयाबाबत संवेदनशील राहावे, लहान मुलांनाही कविता वाचल्यानंतर समजावी व त्यांनीही या कवितांचा रस घ्यावा या उद्देशाने हे पुस्तक लिहिल्याच पोलीस निरीक्षक ओतारी सांगितले.

         डॉ. सुप्रिया आवारे यांनी पुस्तकाबदलची माहिती देत असताना काळोखाचा राजपुत्र हा वसंत आबाजी डहाके यांच्यावरील एक समीक्षा ग्रंथ आहे. वसंत आबाजी डहाके हे 1960 नंतरच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा अतिशय नेमकेपणाने आणि सजगपणाने वेध घेतात. त्यामुळे ही कविता मराठी साहित्य क्षेत्रात खूप महत्त्वाची आहे. तिचा अभ्यास होणे गरजेचे होते. म्हणूनच या पुस्तकाचे लेखन समीक्षा स्वरूपात केल्याचं त्यांनी सांगितले.