HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू संपन्न

डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू संपन्न

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बजाज ऑटो लिमिटेड ,पुणे कंपनीचे कॅम्पस इंटरव्यू संपन्न झाले.या कॅम्पस इंटरव्यूमध्ये डी वाय पाटील पॉलिटेक्निक बरोबरच आयसीआरई गारगोटी , डॉ.बापूजी साळुंखे पॉलिटेक्निक तसेच  ए.डी .शिंदे पॉलिटेक्निक गडहिंग्लज येथील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कॅम्पस ड्राईव्ह मधून  27 विद्यार्थ्यांची कंपनीच्या वतीने निवड करण्यात आली.

यावेळी सी. एस. कोरे यांनी बजाज कंपनी बद्दल माहिती दिली . तसेच विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, बजाज कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. चांगले टेक्निकल ज्ञान,सॉफ्ट स्किल्स आणि आत्मविश्वास या जोरावर विद्यार्थी नक्कीच जॉब मिळवू शकतात. 

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक च्या वतीने विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यू साठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तसेच इंटरव्यू च्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सुद्धा दिल्याचे डॉ.नरके यांनी सांगितले. यावेळी निवड झालेल्या 27 विद्यार्थ्यांना जॉब ऑफर लेटर सुद्धा देण्यात आली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अजय बंगडे , प्रा.अर्जुन पाटील, प्रा. गौरी कदम ,प्रा. संदीप पाटील यांनी नियोजन केले. 

यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार  महेश रेणके डॉ.पी.के.शिंदे, प्रा.एस.बी.शिंदे उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.