मी जिजाऊ बोलतेय ने पालकांची जिंकली मने

मी जिजाऊ बोलतेय ने पालकांची जिंकली मने

बिद्री प्रतिनिधी : मी जिजाऊ बोलतेय... छत्रपती शिवरायांना घडविणारी आई अशी सुरवात करत विद्यार्थ्यीनीनी जिजाऊंच्या व्यथा मांडल्या. त्यामध्ये राजांनी मला एकदा विचारले आम्ही बायकांचा नाच बघायला जावू का, त्यावेळी आम्ही सांगितले राजे आपण बायका नाचवायच्या नसतात तर वाचवायच्या असतात असे सांगणाऱ्या चिमुकल्यां जिजाऊनी प्रजासत्ताकदिनी उपस्थित पालकांची मने जिंकली.

ज्ञानतुळस इंग्लिश मीडियम स्कुलच्या प्रांगणात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी व्यक्तीरेखा सादर केल्या तर अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. दरम्या न राही पाटील, ऋशीका पाटील या विद्यार्थ्यांनीनी सादर केलेल्या जिजाऊंना मात्र सर्वांचीच दाद मिळाली.

प्रशालेचे सहाय्यक शिक्षक युवराज पाटील कपिलेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संस्थापक चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रविंद्र पाटील सचिव शिवानी पाटील, पालक अध्यक्ष रणजीत जाधव, विशाल पाटील, डॉ. संदीप इंगवले, प्राचार्या सुवर्णा चव्हाण, उपप्राचार्या पुजा चौगले, सीईओ महेश देसाईं यांच्यासह पालक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन अश्विनी चांदेकर यांनी तर आभार सौरभ पाटील यांनी मानले.