मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताय; थांबा!

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताय; थांबा!

 मुंबई वृत्तसंस्था : मुंबई -पुणे एक्सप्रेसवे वर मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव / कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे सध्या काम सुरू असून त्यासाठी 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक एक्सप्रेस वेच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा एक्सप्रेस वेच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक एक्सप्रेस वे वरुन सुरू राहणार आहे.

एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.  असे आवाहन मुंबई- पुणे एक्सप्रेसवेच्या नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे 

या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे एक्सप्रेसवेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे.