शरद इंजिनिअरिंगच्या प्रा. सुजित कुंभार यांना पीएच.डी. प्रदान

यड्राव : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अॅटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स विभागाचे प्रा. सुजित यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.
'एक्सिपीरीमेंटल इन्हेस्टीगेशन ऑफ स्पार्क इग्निशन इंजिन युजिंग इथेनॉल ब्लेंडस विथ डिफरंट ऑपरेटिंग कंन्डिशन्स' या विषयावर त्यांनी आपला प्रबंध सादर केला. यासाठी प्राचार्य डॉ. एस. ए. खोत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.