Hemant Dhome : हेमंत ढोमेने सांगितला 'तो' किस्सा....मला वाटलं एड्स झालाय, आईला मिठी मारुन रडलो

Hemant Dhome : हेमंत ढोमेने सांगितला 'तो' किस्सा....मला वाटलं एड्स झालाय, आईला मिठी मारुन रडलो

मुंबई  : प्रख्यात अभिनेता हेमंत ढोमे याने किशोरवयातील धमाल किस्सा शेअर केला आहे. आठवीत असताना मला वाटलं की मला बहुतेक एड्स झालाय, दोन दिवस मी खूप डिप्रेशनमध्ये घालवले, मात्र बॅकबेंचर मुलांनी मला बरीच माहिती दिली आणि 'घोडा तयार आहे' सांगितलं, अशी आठवण ढोमेने सांगितली. अमुकतमुक यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने बिनधास्त भाष्य केलं आहे.

काय होता 'तो' किस्सा 

"तुम्हाला-आम्हाला माहिती असेल... नाईट फॉल हा मुलांच्या आयुष्यात येतोच... माझ्या बाबतीत आठवीत असं झालं, आणि मला असं वाटलं, की मला कुठला तरी गंभीर आजार झालाय, बहुतेक एड्स.. त्यावेळी ते बलवीर पाशा वगैरेही खूप जोरात चालायचं.." असं हेमंत सांगत होता.

आपल्याला एड्स झाला आणि मी माझ्या आईला मिठी मारुन ओक्साबोक्शी रडत होतो. शुक्रवार होता तो.. शनिवार रविवार शाळेला सुट्टी होती. पुढचे दोन तीन दिवस मी खूप डिप्रेशनमध्ये घालवले, की हे काय झालं आपल्याला, असं ढोमे पुढे म्हणाला.

बरं कसं बोलायचं? आपलं फॅमिली स्ट्रक्चर जे आहे, त्याच्यात मी सांगायला लाजतोय, ना माझ्या आई वडिलांना हे कळतंय, कारण त्यांनाही ते एक्स्पोजर नाही. त्यांना कोणी नाही सांगितलं, की एज्युकेट युअर चिल्ड्रन अबाऊट धिस, याकडे हेमंतने लक्ष वेधलं.

घोडा तयार आहे...

सोमवारी मी शाळेत गेलो, मागच्या बेंचवरची पोरं जी दोनदा नापास झाली आहेत, मी त्यांच्यातून असाच गेलो, काय म्हणताय वगैरे... त्यांचं असं झालं की याचं काय आहे आज आपल्यात? मी त्यांना म्हटलं की, ते ना.. एड्स म्हणजे काय असतं रे? त्यांनी ज्या माहित्या दिल्या, त्या इतक्या भयानक होत्या, की अजूनच काय काय वाटायला लागलं, असं हेमंत सांगू लागला.

मी एका मुलाला हिंमत करुन विचारलं, की माझं ना असं असं झालंय.. तो म्हणाला, अरे काय नाय मोठा झाला तू.. आता लग्न, गर्लफ्रेण्ड, पटव आता सुरु झालं... घोडा तयार आहे... मी म्हटलं घोडा तयार आहे म्हणजे... तरीही मी त्या मुलाशी मैत्री केली, पुढे तो माझा बेस्ट फ्रेण्ड झाला, अशी धमाल आठवण हेमंतने सांगितली.