मोफत विधी सहाय्य सल्ला मिळविण्यासाठी काय कराल ?जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना

मोफत विधी सहाय्य सल्ला मिळविण्यासाठी काय कराल ?जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना

गरजूंना मोफत विधी सेवा देण्यासाठी राज्यात 28 ठिकाणी विधी सहाय्य संरक्षण सल्लागार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयातही लोक आभिरक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी आता गरजूंना मोफत विधी सहाय्य सल्ला मिळणार आहे.

     जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश तथा अध्यक्षा मा . के . बी . अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये लोक अभिरक्षक कार्यालय सुरु आहे.

सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कारागृहातील गरजु कैद्यांना निशुल्क सल्ल्यासाठी सात निष्णात विधिज्ञांची टीम कार्यान्वित आहे. सेवेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 

 

*काय आहे विधी सहाय्य संरक्षण सल्लागार योजना*

गरजूंना मोफत विधी सेवा मिळावी, याकरिता राज्यातील 28 ठिकाणी विधी सहाय्य संरक्षण सल्लागार योजना कार्यान्वित आहे. कोल्हापूर येथेही ही योजना सुरु करण्यात आली आहे.

 7 निष्णात विधिज्ञांची निवड

उप मुख्य विधी सहाय्य संरक्षण विधीज्ञ म्हणून ॲड. पी . एम . पाटील व ॲड .विश्वजित घोरपडे तसेच विधी सहाय्यक म्हणून ॲड . रेवती देवलापूरकर ,ॲड. तेजस्वीनी मोकाशी ,ॲड. आशिष देसाई , ॲड. सत्यजीत कुंभार , ॲड. तन्वी शेख यांची निवड झाली आहे .

 *दुर्बल आणि *गरजुंना निशुल्क* सेवा

सर्वसामान्य नागरीक, आर्थिक 

दृष्ट्या दुर्बल आणि कारागृहातील गरजु कैद्यांना उत्कृष्ट सेवेची हमी आणि निशुल्क सेवा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 *कोणत्या सेवा मिळतील ?*

लोक अभिरक्षक कार्यालयाला भेट देणा-या व्यक्तींना कायदेशीर सल्ला व सहाय्य पूर्णपणे मोफत मिळणार आहे.

 पोलिसाकडून अटक होण्यापासून ते विशेषत कारागृहातील गरजू कैदयांचे फौजदारी प्रकरणे चालविणे, अपील दाखल करणे , जामीन करणे, कथित गुन्ह्याच्या ठिकाणास/ क्षेत्राला भेट देणे, कुटुंबाशी चर्चा आदी सेवा मिळणार आहेत.

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत हे लोक अभिरक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे.या योजनेची माहिती कारागृह , पोलिस ठाणे, ठिकाणी प्रसिद्धी करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजू पक्षकांरानी लाभ घ्यावा .

   मा. श्री . प्रितम पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांनी आवाहन केले