शेणीदानाचा 24 वर्षांचा उपक्रम – अचानक तरुण मंडळाचं समाजाप्रती आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूरच्या अचानक तरुण मंडळाने होळी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीत 51,000 शेणीदान केले. गेली 24 वर्षे हा उपक्रम अविरतपणे सुरू असून, समाजातील तालीम संस्था, तरुण मंडळे आणि नागरिकांनी याला मोठा प्रतिसाद दिला आहे.
मंडळाने सुरुवातीला 5,000 शेणी दान करण्यास सुरुवात केली होती, मात्र 2012 पासून हा आकडा 51,000 वर पोहोचला. हा उपक्रम केवळ होळी पौर्णिमेपुरता मर्यादित न ठेवता, वर्षभर स्मशानभूमीला मदत मिळावी यासाठी नागरिकांनी दानपेटीत गुप्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी शिवसेना नेते शिंदे गट सत्यजित उर्फ नाना कदम, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख रवीकिरण इंगवले,अजित चव्हाण, राजेंद्र चव्हाण, शरद मुनिश्वर, दिपक वेढे, सुनील गाताडे, महेश धाडणकर,शैलेश मोरे,ओंकार वेढे,अभिजित जोशी,महेश कापशीकर, संदीप पोवार, गौरव धाडणकर,परेश वेढे,कपिल दंडगे, अभिरथ गायकवाड, सतीश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत जमदग्नी यांनी केले