राजारामपुरीतील रॉयल इमेज हेअर ब्युटी सलून अँड अकॅडमीमध्ये विविध ब्युटी कोर्सेस सुरू
कोल्हापूर (प्रतिनिधी) :
तरुणी आणि महिलांना पुरुषापेक्षा जास्त सजवण्याची आवड असते. त्यांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी राजारामपुरी येथे रॉयल इमेज हेअर ब्युटी सलून अँड अकॅडमीच्या माध्यमातून माफक दरामध्ये हेअर ड्रेसिंग, फेशियल, बॉडी ट्रीटमेंट, वेट लॉस याच्यासह विविध ब्युटी कोर्सेस चालू करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर एकट्या आणि गृहिणी महिलांसाठी शासनमान्य बेसिक ब्युटी कोर्स देखील सुरू करण्यात आला आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना हेअर ड्रेसिंग, फेशियल, मेकअप, वॅक्सिंग, मसाज, नेल आर्ट, इत्यादी बाबत प्रशिक्षण दिले जाते.
यावेळी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. रॉयल इमेज हेअर ब्युटी सलून अँड अकॅडमी गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून विद्यार्थ्यानी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शासनमान्य अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या पुढील कारकिर्दी साठी उपयुक्त ठरते.
यावेळी बोलताना रॉयल इमेज हेअर ब्युटी सलून अँड अकॅडमीचे संचालक सोमन गवळी म्हणाले, "आमच्या अकॅडमीमध्ये अनुभवी आणि कुशल शिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. आमचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना त्यांच्या सौंदर्याचा विकास करण्यास मदत करणे हा आहे.
नारायणी अपार्टमेंट, दुसरा मजला सिलाई वर्ल्ड च्या शेजारी, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सोमन गवळी, संचालिका सुरेखा गवळी आणि सिद्धार्थ गवळी यांनी केलं.