विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : कोल्हापूर हे असे केंद्र आहे जिथे रुग्ण कर्नाटक, गोवा तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी येतात. डॉ. संतोष प्रभू व त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापुरातले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू केले. ही एक आनंदाची गोष्ट आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्व प्रकारच्या सोयी या एकाच ठिकाणी या हॉस्पिटलमुळे उपलब्ध होतील. आणि रुग्णसेवा ही अव्याहत सुरू राहील. या हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण येईल त्याला आरोग्य लाभ व्हावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विन्सच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन सुसज्ज इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सर्वसामान्यांसाठी हे हॉस्पिटल उपयुक्त ठरेल आणि येथे जास्तीत जास्त रुग्ण उपचार घेऊन बरे होतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
२२०बेड्सचे अत्याधुनिक सुसज्ज असणारे हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून आरोग्यसेवेतील उत्कृष्टता या हॉस्पिटलद्वारे आणण्यात आली आहे. आशेचा, आरोग्याचा, नवशोधण्याचा दीपस्तंभ म्हणजे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून इथे उच्चस्तरीय आरोग्यसेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच सर्वसामान्यांना परवडणारे अत्याधुनिक उपचार आणि ६५ वर्षाच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवांचा हा वारसा आहे. रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असून आधुनिक तंत्रज्ञान, सर्वोत्कृष्ट जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांचा येथे समावेश आहे. अनुभवी, तज्ञ डॉक्टर्स, करुणामय रुग्णसेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे एकत्रिकरण इथे करण्यात आले आहे. इथे सेवा देणाऱ्या ८० अनुभवी तज्ञ डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असतील. दर्जेदार आरोग्य सेवेचा दीपस्तंभ म्हणून हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ओळखले जाणार आहे. स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर तसेच रुग्णाच्या मानसिक समाधानावर विशेष भर दिलेला आहे. आत्तापर्यंत विन्समध्ये मेंदू मणक्याचे सर्व उपचार होत होते. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये
आंतररुग्ण चिकित्सा,क्रिटिकल केअर, अॅडव्हान्स अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर, इमर्जन्सी मेडिसिन ट्रामा, हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया, त्वचारोग, प्लास्टिक, एस्थेटिक आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया,एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जरी, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, किडनी विकार, मूत्र विकार, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, बालरोग, कॅन्सरसह जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यांच्या उत्कृष्ट सेवा देण्यात येणार आहे तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात एआय चा वापर विन्समध्ये होत आहे. भविष्यकाळात रोबोटिक शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.तसेच स्मार्ट आयसीयू आणि कोणताही आजार असो, उत्तम उपचार या सर्व बलस्थानानुसार काम करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी व वैद्यकीय तज्ञ यामुळे हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उज्वल भविष्यासाठी पायाभरणी असेल असे प्रतिपादन विन्सचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आ. अमल महाडिक, डॉ. सुजाता प्रभू, डॉ. आकाश प्रभू, डॉ. डीओना प्रभू,डॉ. संदीप पाटील, व्यंकट होळसंबे, संदीप वनमाळी, चिन्मय ठक्कर, दामोदर घोलकर ,माजी आ. प्रकाश आवाडे, कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी खासदार निवेदिता माने, मौसमी आवाडे यांच्या यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.