कॉम्रेड पानसरे स्मारकाचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा - आमदार सतेज पाटील
प्रतिभानगर येथील जेष्ठ नेते कॉम्रेड गोंविदाराव पानसरे यांच्या स्मारकचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा. याकरीता कार्यकर्त्यांसह भागातील नगरसेवकांनी नागरीकांच्या घरोघरी जावून सोहळ्यास आवार्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. अशा सुचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या. वि .स.खांडेकर प्रशाला प्रांगणातील शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारकाच्या उद्या, मंगळवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मित्रमंडळी, भागातील सर्व नागरीकांना वैयक्तिक गाठीभेटी घेवून निमंत्रण द्यावे. यावेळी झालेल्या बैठकीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डी. राजा, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, डॉ. भालचंद्र कानगो आदी मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. त्यामुळे झेड सुरक्षा व्यवस्था असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार जयश्री जाधव, भाकपचे ज्येष्ठ नेते दिलीप पवार, जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, बॅक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव परुळेकर, आयटकचे एस.बी.पाटील, दिलदार मुजावर,उमेश कदम, उमेश पानसरे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आदी उपस्थित होते.