चाकू थोडा खोल गेला असता तर... सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत डॉक्टरांचं मोठं विधान
मुंबई : गुरुवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरात घुसून,सैफवर चाकूने हल्ला केला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू झाले. सैफचे चाहते त्याच्या तब्येतीच्या अपडेट्सवर लक्ष ठेवून आहेत. आता सैफ अली खानची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
सैफ मुंबईतील लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. अशातच डॉक्टरांनी एक नवे विधान केले आहे. डॉक्टर म्हणाले की, जर चाकू थोडा खोल गेला असता तर सैफला अर्धांगवायू होऊ शकला असता.
काय म्हणाले डॉक्टर ?
सैफ अली खानच्या शरीरावर सहा ठिकाणी वार करण्यात आले असून, त्यापैकी दोन जखमा खूप खोल आहेत. नितीन डांगे यांनी सैफ अली खानवर उपचार केले आहेत. सैफच्या तब्येतीची अपडेट शेअर करताना त्यांनी सांगितले की, तो आता ठीक आहे. डॉ. डांगे म्हणाले, "या हल्ल्यात त्याला चार खोल जखमा झाल्या आणि दोन किरकोळ जखमा झाल्या. यापैकी एका चाकूचा २.५ इंचाचा तुकडा त्याच्या पाठीत घुसला होता. जर चाकू त्याच्या पाठीत खोलवर गेला असता तर, त्यामुळे अर्धांगवायू होऊ शकला असता. परंतु सुदैवाने सैफला कोणत्याही मोठ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागला नाही." म्हणजे त्याच्या शरीराचा कोणताही भाग काम करणे थांबवू शकला असता. ज्यामुळे, त्याची फिल्मी कारकीर्द संपुष्टात आली असती.