कंगणा रणौतच्या 'इमर्जन्सी' ला 'या' देशात प्रदर्शनास घातली बंदी,कारण आलं समोर

कंगणा रणौतच्या 'इमर्जन्सी' ला  'या' देशात प्रदर्शनास घातली बंदी,कारण आलं समोर

मुंबई: कंगणा रणौतचा बहुचर्चित 'इमर्जन्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे कोर्टाने या चित्रपट प्रदर्शनास मनाई केली होती. आता या चित्रपटातील काही सीनना कात्री लावल्यानंतर कोर्टाने बंदी उठवली आहे. परंतु भारताचा शेजारी देश असणा-या बांगलादेशमध्ये या चित्रपटाला बंदी घालण्यात आली आहे. 

भारत आणि बांगलादेश यांच्यातला वाढता तणाव पाहता बांगलादेशकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.कंगनाचा हा सिनेमा माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित  आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच हा सिनेमा वादात अडकला होता. 

शीख समुदायाच्या अनेक संघटनांचा विरोध 

या सिनेमात शीख समुदाय, तसेच ऐतिहासिक गोष्टींचे चुकीचं चित्रण करण्यात आलं आहे’, असा आक्षेप शिरोमणी अकाली दलसह शीख समुदायाच्या अनेक संघटनांनी नोंदवला होता. त्या पार्श्वभूमीवर, सेन्सॉर बोर्डनं चित्रपटाच्या प्रदर्शनास प्रमाणपत्र दिलं नव्हतं.

सिनेमा देशाच्या इतिहासातल्या अत्यंत वादग्रस्त कालखंडावर आधारित 

कंगनाचं लेखन-दिग्दर्शन असलेला 'इमर्जन्सी' हा सिनेमा देशाच्या इतिहासातल्या अत्यंत वादग्रस्त कालखंडावर आधारित असल्यानं आता विरोधकांनीही यावर टीका केली आहे. सिनेमातल्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर कंगनासोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विषाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

... म्हणून बांगलादेशात घातली बंदी 

अखेर सिनेमातल्या काही दृश्यांवर कात्री लावल्यानंतर कोर्टानं सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. पण आता बांगलादेशात हा सिनेमा प्रदर्शित होणार नाहीये. त्याचं कारण आता समोर आलंय.१९७१च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय लष्कर आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारनं घेतलेली भूमिका दाखवण्यात आली आहे. इंदिरा गांधी यांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता मानले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांना समर्थन दिलं होतं. तसंच त्यांनी इंदिरा यांना दुर्गा देवी म्हटलं होतं. पण या सिनेमात विरोधकांकडून शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाल्याचं दाखवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. याच गोष्टीवर आक्षेप घेत बांगलादेशात या सिनेमाला विरोध होत असून सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.