काजोलची लेक निसा करणार बॉलिवूड पदार्पण ? ; काजोलने केला खुलासा

काजोलची लेक निसा करणार बॉलिवूड पदार्पण ? ; काजोलने केला खुलासा

मुंबई : अजय देवगण आणि काजोल यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले आहे. अजूनही त्यांच्या प्रसिद्धीमध्ये कमी झालेली नाही. आता लोकांच्या नजरा त्यांची मुलगी निसावर खिळल्या आहेत. इतर स्टार किड्सप्रमाणे येणाऱ्या काळात काजोल अजयची लाडकी लेकही पडद्यावर दिसेल का असा प्रश्न लोकांना पडला आहे. अशातच आता काजोलने तिची मुलगी निसाच्या चित्रपटसृष्टीत एण्ट्रीबद्दल एक खुलासा केला आहे.

 

'न्यूज १८' च्या एका कार्यक्रमात काजोलने काही प्रश्नांची उत्तरे दिली. निसाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारले असता, तिने स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली, 'अजिबात नाही.' ती पदार्पण करेल असे मला वाटत नाही. ती २२ वर्षांची आहे... २२ वर्षांची होणार आहे. मला वाटतं तिने आता या इंडस्ट्रीत यायचं नाही असं ठरवलं आहे.'

'हे' आहेत काजोलचे आगामी चित्रपट

काजोलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती 'मां' या पौराणिक हॉरर चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन विशाल फुरिया करणार आहेत. ती सध्या 'छोरी २' च्या दिग्दर्शनामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचा पहिला लूकही समोर आला, जो प्रेक्षकांना खूप आवडलाय. यामध्ये ती तिच्या मुलीचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. यात रोनित रॉय आणि इंद्रनील सेनगुप्ता देखील दिसतील. हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.