HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद आयटीआयमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

शरद आयटीआयमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

यड्राव (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज हा विषय डोक्यावर घेवून नाचण्याचा नसून डोक्यात घेवून त्याचे अनुकरण करण्याचा विषय आहे. त्यामुळे आपण सर्व तरुणांनी महाराज यांचे चरित्र वाचा त्याचे अनुकरण करा. त्यातून प्रेरणा घ्या, आणि समाजात वावरा असे प्रतिपादन अॅड. प्रा. श्रीकांत माळकर यांनी केले. ते यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळानिमित्त आयोजित कुटुंब प्रबोधन ह्या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. यावेळी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 

संस्थेचे डायरेक्टर अनिल बागणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व क्षेत्रातील गुण विद्यार्थ्यांनी अवगत करावेत. महाराजांच्या कालखंडात अगदी कमी वेळेत साडेतीनशे किल्ले बांधले. ह्या तंत्रज्ञानाचा शोध घेवून तो अभ्यासक्रमात आणावा लागेल. 

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन झाले. यावेळी तंत्रप्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यामध्ये सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेले प्रकल्प मांडण्यात आले होते. यावेळी लेझीम खेळाचे सादरीकरण झाले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.बी. भरमगोंडा यांनी केले. सूत्रसंचालन एस. जे. चावरे यांनी केले. आभार एन.बी. जाधव यांनी मानले.

यावेळी श्रीकांत माळकर यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.