आता आणखी एका क्रिकेटपटूची घटस्फोटाची चर्चा
मुंबई : भारतीय क्रिकेट पटू हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशा यांचा घटस्फोट झाला. आता आणखी एक क्रिकेटियर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. युजवेंद्र चहल याचाही घटस्फोट होणार अशी चर्चा सुरु आहे. युजवेंद्र चहल याने 2020 मध्ये धनश्री वर्मा हिच्यासोबत लग्न केले. त्यांच्या विवाहाला चार वर्षे पूर्ण होत आहेत.
चार वर्षातच धनश्री आणि युजवेंद्र चहल यांच्यात बिनसले आहे. धनश्री आणि युजवेंद्र चहल यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही. दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नसल्याने आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. वास्तविक धनुश्री व युजवेंद्र नेहमी समाज माध्यमावर सक्रिय असतात.