HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद पवारांच्या वाढदिनी अजित पवार बड्या नेत्यांसह भेटीला ,चर्चांना उधाण

शरद पवारांच्या वाढदिनी अजित पवार बड्या नेत्यांसह भेटीला ,चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादीचे SP पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज ८४ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे  औचित्य साधून  शरद पवारांची अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी भेट घेतली आहे. दिल्ली येथील ६ जनपथ बंगल्यावर जाऊन सर्व नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. पक्षाच्या निर्णयात महत्वाची भूमिका बजावणारे  प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळही यावेळी उपस्थित होते. त्यासोबत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवारही यावेळी तिथे सोबत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवार यांनी ट्विट करतही पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. वाढदिवसादिवशी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.

बुधवारी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले होते. अमित शहांसोबतची ही भेट मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात असल्याची चर्चा होती. मात्र अजित पवार कुठल्याही भेटीमध्ये दिसले नाही. तर आज गुरूवारी अजित पवार शरद पवारांना भेटायला गेल्याने दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं सुरू आहे हे स्पष्ट झालं आहे. अजित पवारांच्या या भेटीला कौटुंबिक म्हणता येणार नाही, कारण राष्ट्रवादीतील सर्व दिग्गज आणि मोठे नेते ज्यांचं कोणताही निर्णय घेताना नेहमी मत घेतलं जातं अशा नेत्यांनीही हजेरी लावल्यानेही वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आलं आहे.

 भेटीमध्ये काय घडलं हे गुलदस्त्यात 

प्रफुल्ल पटेल यांनी दहा दिवसांआधी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समजत आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीमधील अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील समन्वयक म्हणून काम करताना अनेकदा दिसले आहेत. अजित पवार गटातील बड्या नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. कारण मागील वाढदिवसाला कोणत्याही नेत्यांनी हजेरी लावलेली नव्हती.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.