शिंदेंच्या आजच्या बैठका रद्द; ५ डिसेंबरचा शपथविधीवर प्रश्नचिन्ह

शिंदेंच्या आजच्या बैठका रद्द; ५ डिसेंबरचा शपथविधीवर प्रश्नचिन्ह

मुंबई वृत्तसंस्था : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, राज्यातलं राजकीय वातावरण अस्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे गावाहून परत ठाण्यात आले असले तरी ते तबियत ठिक नसल्याने डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. ते कुणालाही भेटणार नाहीत. आज महत्त्वाच्या बैठक होणार होत्या मात्र या बैठका रद्द होण्याची शक्यताही दाट आहे. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

भाजपाने ५ डिसेंबरला मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रम जाहीर केला असला तरी अद्याप मुख्यमंत्रीसह अन्य खात्यांचा तिढा कायम आहे. एकनाथ शिंदे , अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तेथे त्यांनी सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली. शिंदे व शहा यांनी स्वतंत्रपणे चर्चाही केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मात्र यानंतर शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावी गेले. गावात गेल्यावर प्रकृती बिघडली. प्रकृती सुधारल्यावर शिंदे शनिवारी ठाण्यात आले. गावातून निघताना माध्यमाशी बोलताना शिंदे यांनी महायुतीत समन्वय असल्याचे सांगितले. शिंदे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच आराम करणार आहेत. आज जरी शिंदे ठाण्यात असले तरी त्यांची अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे 5 डिसेंबर चा शपथविधी होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.