HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद इन्स्टिट्युटला इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन मार्फत पुरस्कार

शरद इन्स्टिट्युटला इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन मार्फत पुरस्कार

यड्राव,(प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकच्या विद्यार्थ्यांनी विविध झोनल व इंटर झोनल स्पर्धेत यश मिळविले आहे. त्यामुळे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन मार्फत पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. पुणे येथील शासकिय तंत्रनिकेतनमध्ये असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा सन्मान केला.

झोनल स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकमधील मुलींनी हॉलीबॉल, कॅरम, शॉट पुट, उंच उडी क्रिडा प्रकारात प्रथम तर खो-खो, बुध्दिबळ, थाली फेक, लांब उडी क्रिडा प्रकारात व्दितीय क्रमांक पटकविला. मुलांनी कुस्ती(७४ किलो), थाळी फेक, वजन उचलणे (६९ किलो) यामध्ये प्रथम  क्रमांक पटकविला. तर वजन उचलणे (७७ व १०५ किलो), धावणे रिले (४०० मीटर) क्रिडा प्रकारात व्दितीय क्रमांक मिळविला.

इंटर झोनल स्पर्धेत मुलींनी उंच उडीमध्येप्रथम, हॉलिबॉलमध्ये व्दितीय तर मुलांनी थाळी फेकमध्ये व्दितीय क्रमांक मिळविला. या विविध स्पर्धेतील यशामुळे संस्थेचा असोसिएशनकडून सन्मान करण्यात आला. 

संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य बी. एस. ताशीलदार यांचे सहकार्य तर प्रा. एस.आर. भरमगोंडा, एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.  

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.