जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त माहितीसत्र संपन्न

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त माहितीसत्र संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जागतिक युवा कौशल्य दिनाच्या पार्श्वभूमीवर व मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे महावीर महाविद्यालयातील बी. व्होक विभागात विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्र घेण्यात आले.

या सत्रात ऑटोमोबाईल, ॲग्रीकल्चर, प्रिंटींग अँड पब्लिशिंग या विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले. सत्राची सुरुवात ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख प्रा. सुरज शिंदे यांच्या प्रास्ताविकाने झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना, असे आवाहन करुन स्वयंरोजगारासाठी आर्थिक पाठबळ मिळवा, असे श्री. आंग्रे यांनी सांगितले.

यावेळी योजनेचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनलेल्या माजी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन करुन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रा. विनय बिरंजे यांनी आभार मानले. यावेळी महावीर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. संदीप नलवडे, डॉ. मिरजकर, महामंडळाचे जिल्हा समन्वयक विश्वजीत पाटील तसेच संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.